गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
एकदंत, वक्रतुंड
लंबोदर ,विनायक
गौरी पुत्र, गणपती
रिद्धी,सिध्दीचा नायक...१!
पीतांबर,उमा पुत्र
प्रथमेश,क्षिप्रा नावे
वक्रतुंड, बुध्दी प्रिय
गजवक्र, मनोभावे...२!
भालचंद्र,एकदंत
गदाधर,शूपकर्ण
चतुर्भुज,यशस्कर
पूजनात वाहू पर्ण...३!
गणाध्यक्ष,महेश्वर
देवव्रत, यशस्कर
क्षेमकरी,नि हेरंब
बुध्दीदाता देई वर...४!
लंबकर्ण,द्वैमातुर
मनोमय,वरप्रद
महाबल,यज्ञकाय
पित नेसलाशी कद..५!
नमस्तेतू,तू हरिद्र
गजानन,एकाक्षर
महागणपती,दुर्जा
देई गणराज वर ...६!
कृष्णपिंगाक्ष नाव
सहा नंबर विकट
संकटांना दूर करी
तारी गणेश संकट...७!
