नमन
नमन
नमन राष्ट्रमाता जिजाऊंच्या कुशल शिकवणूकीला ।
अन शिवरायांच्या कर्तृत्ववान कामगिरीला ।।
नमन सत्यशोधक ज्योतिबांच्या परिवर्तन कार्याला ।
अन ज्ञानज्योती माई सावित्रीच्या कणखर मनाला ।।
नमन आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्षतेच्या संघर्षाला ।
अन शालिनतेच प्रतिक माता रमाईच्या त्यागाला ।।
नमन गाडगेबाबांच्या प्रबोधनशिल कीर्तनाला ।
अन अण्णांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला ।।
नमन अन्नदात्या बळीराजाच्या घामाच्या थेंबाला ।
अन सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या सामर्थ्याला ।।
नमन दाभोलकरांच्या श्रद्धेच्या मंत्राला ।
अन पानसरेंच्या पुरोगामी विचारांना ।।
नमन गौरी लंकेशच्या झुंजार लेखनीला ।
अन कलबुर्गीच्या नडगमगनाऱ्या वृत्तीला ।।
नमन अंधारात उगणाऱ्या क्रांतीच्या सूर्याला ।
अन विषमतेचा गळा कापणाऱ्या प्रत्येक समतावाद्याला ।।
