STORYMIRROR

Supriya Devkar

Classics

4  

Supriya Devkar

Classics

तोल मनाचा

तोल मनाचा

1 min
477

तोल मनाचा सावरताना 

तुला कितीदा मी पाहिले

तारेवरल्या कसरतीत

 मग जगणे तुझे राहिले


हात दिलास सार्यांना 

परि नाही केलिस पर्वा

दुःख सारून वाहिल्यास

मायेच्या निर्मळ दूर्वा 


नाही मिरवलास तोरा

धरलीस सत्याचीच कास

मृगजळामागे धावता 

 लावली नाही खोटी आस


रिते राहिले हात जरी 

आनंद जगण्याचा मिळवलास

अपेक्षांचे ओझे झुगारुन 

समाधानाने तू जगला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics