STORYMIRROR

Prathamesh Bobhate

Romance Classics

4  

Prathamesh Bobhate

Romance Classics

पाऊस जाणिवेचा...

पाऊस जाणिवेचा...

1 min
736

कातर वेळचा गार वारा, अनेक स्मृती देऊन भेटतो,

मिट्ट काळोख, सोबत मृदगंध; पाऊस असा मग मनी दाटतो. 


आवडतो मला पाऊस, आवडतो मला पाऊस; गुलमोहर फुलविणारा,

तेवढ्याच मायेने नंतर अलगद बाभळीलाही झुलविणारा...


पण प्रत्येक वेळच्या पावसाला या नव्यानेच का यावे वाटते?

चैतन्य नवे असले, तरी आठवण मात्र जुनीच दाटते... 


बरं, आठवणीतला पाऊस नेमका त्याच कट्ट्यावरती बरसतो,

तिचा वेडा चातक मग एक-एका थेंबापायी तरसतो... 


काय करावे पावसाचे अशा, खरच काही उमजत नाही,

अन् देऊ पहातो तोही जणू पुनःपुन्हा तीच एक ग्वाही... 


सोबत (ती) असता, आठवणीही नक्कीच आनंदाने कुरवाळेन ना,

नात्यांच्या त्या ओलाव्याला अहो हसत-हसत मग कवटाळेन ना... 


वस्तुस्थिती जी फार काही साधर्म्य साधणारी नाही,

म्हणूनच बहुधा भावत नसावा, सुखावल्या जरी दिशा दाही... 


त्याला काय? त्याला काय, कशाची, अग्गदी कशाचीही तमा नाही,

तो आपला बरसतोय, नवी पालवी ही जी सुखावू पाही... 


सुरुवातच जी त्याची अशी, थेट मनी भिडणारी,

शेवट तेव्हढा बरा व्हावा, असावी सोबत भिजणारी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance