मौनी वेदना अशी...
मौनी वेदना अशी...
बोलायाचे मी ही तेव्हा, जाणीवपूर्वक टाळले होते;
सवड नाही तुला हेरूनी, मौन आसवांनी माझ्या पाळले होते.
हासलेले पाहुनी तुजला, मन हे वेडे भाळले होते;
त्यावरून उगाचंच मग, अर्थ मी ते सारे लावले होते.
होकाराचे सोड गं, दुःखी नकारही मज भेटलेला नाही,
भास बहुधा तेव्हाही, नुसतेच मी कवटाळले होते.
मोजावयां अगं बसता घाव, आकड्यांत आजही काही चुकले होते;
आठवेच ना, क्रम सारा बरोबर तरी नाव कुठले वगळले होते?
ओळखीचा चेहरा मग, वाटला तर खरं;
ओळखीचे घाव तेचं, सारे वाळलेले म्हणून बरं!
व्यक्त इतुका जाहलो अन् लिहून टाकले सारे;
दु:खालाही कंटाळा आला, म्हणे "आवर तुझे नेहमीचे पसारे!"
लिहीले म्हणूनी, काव्यालाही वाहवा मिळाली खरी;
पटले पण; दिसणाऱ्या जखमेपेक्षा, बोचणारी वेदना बरी!
