STORYMIRROR

Prathamesh Bobhate

Classics Others

4  

Prathamesh Bobhate

Classics Others

सांग की गं खरं ???

सांग की गं खरं ???

1 min
358

कशासाठी आता सांग पुन्हा भेटायाचे ?

होते तेच सारे आणि असे रेटायाचे...

आत्ता कुठे ... आत्ता कुठे, विसरलो होतो की गं सारं ;

रस्ता पुढे नवा, जुनी बंद सारी दारं ... 

रमणं आता आठवणींत जमेनासं झालंय ;

पाण्यालाही डोहाचं तळ जे मिळालंय !!!

प्रवाहासोबतच वाहणं आता वाटू लागलंय बरं ;

तुही तेच करतेयस ना , सांग की गं खरं !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics