बरेच येथे चुकत गेले...
बरेच येथे चुकत गेले...
जाते म्हणतेस हरकत नाही, ओघळते अश्रू पाहून जा,
नाते तोडतेस हरकत नाही, निसटता निरोप देऊन जा.
जाणून सारे संपविताना, ही बुडती नाव तू पाहून जा,
जाळते आहेस, हरकत नाही; पण जळते गाव पाहून जा.
वेळ देईलचं उत्तर साऱ्याचे, काही वर्षांनंतर पहा,
अन् यावे वाटले, तेव्हा मात्र; तर सोबतीचे क्षण तेवढे आठवून पहा.
होतो सोबत आजवर, पण आता मात्र एकटी रहा,
सांत्वना खांदा आता दुसरा, मिळतो का ते पुन्हा पहा.
सवयचं जी तुझी जुनी, खांदे नवे शोधण्याची;
चूक माझीचं, उमजली नंतर; शिकवण जी कायम माणूसकी जपण्याची.
काय घडले, कोण चुकले, वास्तव हे ओठांवरचे नेले;
कळण्याआधीच खरोखरी, बरेच येथे चुकत गेले, बरेच येथे चुकत गेले.

