Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prathamesh Bobhate

Drama Classics Fantasy

4.0  

Prathamesh Bobhate

Drama Classics Fantasy

बरं का गं, कविते…

बरं का गं, कविते…

1 min
248


का ? का, तुला वाटतेय आत्ताच सुचावे ?

नाही इच्छा काही लिहीण्याची; वाटतेय शांतच बसावे


नको त्या वेळी हल्ली बरी सुचतेस तू

फावला मी असतां मात्र, का दडून बसतेस तू ?


बरोब्बर...! तेव्हा नाही ना वाटणार तुला, आत्ताच जन्मावे ;

कामात असतां बरे जमते, तुला मला विचारांत टाकावे


का ? का ? का ? का बरं अशी वागतेस? ४ ओळींनंतर कधी माझ्यावरच रुसतेस?

टप्प्या-टप्प्याने येऊन कधी देतेस दिलासा, तर संपून जाऊन एकाच दमात; कधी करतेस खुलासा


तुलाही हे माहिती आहे ; असतो मी तुझ्यावरच विसंबून,

म्हणूनच नखरे असे ; करतेस ना गं जाणून-बुजून?


कशीही आलीस, केव्हाही आलीस ; तरी आनंद जो तू साऱ्या देतेस

त्याच्याचमुळे वेळ चुकीची असता सुद्धा, सोबत त्यांना वाहून नेतेस


तुझ्याविना माझे असे, नाहीच गं येथे काही,

सोबतीने एक-मेकाच्या दुमदुमुवू की दिशा दाही


कायमसाठी तुला आता, आज करतोच एक विनवणी ;

पटा-पट सुचत जा गं बाई, नको घेऊस अशी शिकवणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama