प्रेमा, तुझा रंग कसा ?
प्रेमा, तुझा रंग कसा ?
प्रेमा, तुझा रंग कसा ?
प्रेमा, तुझा रंग कसा ?
उत्कटता जशी, की दाह तसा ?
प्रवाससुद्धा तुझा अरे,
प्रत्येकाकरवी वेगळा
अनुभूती कुणां क्षणा-क्षणाला,
तर वर्षांहूनही, कुणी प्रतिक्षेत हा !
पद्धत सुद्धा व्यक्त होण्याची,
करून ठेवलीयेस अशी असमान
कळत नाही; कोण खरे,
अन् कोण देते पोकळ खूणा ?
वाटणी तुझी, विभाजनात या,
इतकी जी अशी दोलायमान
उभा सोबती दिसता देखील,
भागत नाही तीव्र तहान
हरविलेले, चुकलेले, सोडूनी आलेलेही;
नाहीत येथे कमी,
दोष त्यांचा इतकाच,
मागितली जी पक्की हमी
मर्यादाही कालबाह्य, करतोस की रे सहज अगदी,
विश्वास ठेवावा तरी कसा, व्यवहार इथे जे सारे नगदी
शोधून तुला, थकलो आता,
तयार नाही, हृदय पुन्हा
अस्तित्वच तुझे आता मान्य नाही
कोरल्यास की रे खूणा जुन्या

