STORYMIRROR

Prathamesh Bobhate

Romance Classics Fantasy

3  

Prathamesh Bobhate

Romance Classics Fantasy

बोलू आपण

बोलू आपण

1 min
216

बदललंय सारं, माहितीये मला;

म्हणून क्वचित का होईना, बोलू आपण


खुशालीही जाणण्याआधी, विचार करावा लागतो आता;

म्हणून मोजकचं का होईना, बोलू आपण


निमित्ताची वाट पाहूया, कारणे नवी शोधत राहूया;

ठरवून का होईना, बोलू आपण


आठवणींत रमूया, पुन्हा तसेच होऊ पाहूया;

जुनचं का होईना, बोलू आपण


प्राधान्ये वेगळी, माणसे निराळी, पटतंय सारं;

अनोळखी म्हणून का होईना, बोलू आपण


वाढदिवसचं उरलाय जणू, निमित्ताच्याही नावे आता;

देण्या शुभेच्छा का होईना, बोलू आपण


काल जे बोललो, उद्याही बोलू;

निदान आजतरी याहून वेगळे, काहीतरी बोलू आपण


"बोलू आपण, बोलू आपण" हे ही नुसतेचं म्हणत चाललोय;

खरोखरी अधांतरी, असेच का गं राहू आपण?

बोलू आपण, हं... हं... बोलू आपण...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance