STORYMIRROR

Prathamesh Bobhate

Drama Action Classics

3  

Prathamesh Bobhate

Drama Action Classics

मित्र भेटतात तेव्हा

मित्र भेटतात तेव्हा

1 min
821

दिवसाची रात्र होते, अन् रात्रीचाही होतो दिवस

नसतात कुठलीच बंधनं, बिनधास्त हवं तितकं डिवच


वेळ सरत असते, पण शब्द थांबत नाहीत

यारांच्या त्या मैफिलीत, सारेच अहो तिऱ्हाईत


असतो कुणी यथेच्छ यशोशिखरावर, तर असतो कुणी अजुनही स्थिरावण्या धडपडत

यश, कीर्ती, वय, पद हे सारे येथे हरवून जाते

आपल्यातलेच आपणही जणू कुणी वेगळे होऊ पाहते


रक्ताचे नसते नाते, रक्ताचे नसते नाते; तरी अगदी जवळचेच वाटते

खरं सांगतो, खरं सांगतो, आयुष्यात मित्रांची गरज भासते


कधी मस्ती, कधी धमाल, तिखट-गोड आठवणींना उजाळा,

असता सखे सोबती, नव्यासमवेत सारे जुनेही उगाळा


मित्र भेटतात तेव्हा, जणू आसमंत भरून जातो,

रिक्त, ओसाड माळरानही, हिरवागार होऊ पाहतो


मिळतो अंधाऱ्या वाटेतही, दिमाखात तेवणारा प्रकाशाचा एक दिवा,

सार्थक होते जीवनाचे, खऱ्या अर्थी - मित्र भेटतात तेव्हा, मित्र भेटतात तेव्हा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama