बाप्पाला निरोप
बाप्पाला निरोप
पुढच्या वर्षी लवकर या
कर जोडून मागणे देवा
संकटात हवी साथ तुमची
घडू द्यावी मनोभावे सेवा...१!
दहा दिवसाचा चालतो
तुझा सुंदर हा सोहळा
घरदार सारे सजवले
फुले सारा भक्तांचा मळा...२!
आज आला निरोपाचा दिवस
कासावीस झाले बाप्पा मन
आळविते तुला रे गणराया
पुढच्या वर्षी ही मिळू दे हा क्षण..३!
नित्य तुझी पूजा आरती
घरभर माणसं जमलेली
बालगोपाळांचा दंगा,मस्ती
सारे भक्ती भावात रंगलेली...४!
निरोप देते एक वचन दे
पुढच्या वर्षी मात्र लवकर यावे
अश्रुनयनी दाटले देते निरोप
संकटे सारी जातांना घेऊन जावे...५!
