* श्रावण सरी *
* श्रावण सरी *
आला श्रावण वर्षा ऋतुची हिरवळ पसरत उरी,
ढोल ढगांचा गडगड करीत येती श्रावण सरी।।
लपाछपीचा खेळ खेळती ऊन, सरींचे सडे,
नभोमंडपी छटा उमटती सप्तरंगीत कडे।।
झुलती शेते, झाडे, वेली मजेत पाने, फुले,
श्रावणातील सौंदर्यांने सारा निसर्ग डुले।।
विहार करती खग स्वच्छंदी सांजसकाळी नभी,
हिरवा शालू धरा नेसून बहरून असे उभी।।
डोंगरमाथी कडेकपारी खळखळणारे झरे,
निसर्गातील किमया न्यारी मनी आनंद भरे।।
