STORYMIRROR

शशिकांत राऊत

Tragedy Classics

3  

शशिकांत राऊत

Tragedy Classics

* असह्य हा एकटेपणा *

* असह्य हा एकटेपणा *

1 min
287

काय करावे सुचत नाही,

सांगूतरी कसं कोणा...

सर्वांच्या हातात मोबाईल,

असह्य हा एकटेपणा...

     सर्वच बसती मोबाईल घेऊन,

     आणि एकटेच हसत बसणे...

     असह्य हा एकटेपणा वाटतो,

     नाही कोणाचे कोणाशी बोलणे...

कसा आणि किती बसू,

एकटाच असा घरात...

असह्य हा एकटेपणा,

मोबाईल च्या युगात...

     जेवणही एकत्र नाही,

     मोबाईल सर्वस्वी झाले...

     असह्य हा एकटेपणा,

     घराघरात अंतर वाढले...

मोबाईल ची दुनिया अशी कशी,

घरच्याच माणसांना केले दूर...

असह्य हा एकटेपणा होऊन,

मनात सतत वाटते हि हुरहूर...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy