STORYMIRROR

शशिकांत राऊत

Inspirational

3  

शशिकांत राऊत

Inspirational

घास दिवाळीचा

घास दिवाळीचा

1 min
321

दिपावलीचा सण वर्षाचा, भास होत आहे,

कित्येकांच्या तोंडचा तोचि, घास होत आहे।।


वर्षात किती सणवार कसे, आले अन् गेले,

कोणासाठी गोड करावे, त्रास होत आहे।।


अनेक फिरते भुईचक्र ते, जाग्यावर विझले,

अन् वरखाली फटाकड्यांचा, श्व़ास होत आहे।।


कधी फटाका फुटेल अशीच, सर्वांना चिंता,

डॉक्टरांप्रती देवमाणूस, ध्यास होत आहे।।


रस्तोरस्ती पोलीस उभा, रॉकेट बनूनी,

रक्षणार्थ तो जनतेसाठी, दास होत आहे।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational