STORYMIRROR

शशिकांत राऊत

Classics Inspirational

3  

शशिकांत राऊत

Classics Inspirational

* या बेभान क्षणी *

* या बेभान क्षणी *

1 min
296

या बेभान क्षणी,

मन हे भिरभिरते...

वाऱ्याच्या वेगानं,

सखी पाशी जाते...


या बेभान क्षणी,

मन होई अस्वस्थ...

आठवण सखीची, 

बसत नाही स्वस्थ...


या बेभान क्षणी,

मन ढगाळ नभी...

सारीकडे दिसते,

सखी आहे उभी...


या बेभान क्षणी,

मनी कंठ दाटतो...

सखीची सोबत,

आधारच वाटतो...


या बेभान क्षणी,

मन आनंदी आनंद...

सखीला भेटताच,

होतो प्रेमामध्ये धुंद...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics