STORYMIRROR

शशिकांत राऊत

Classics

4  

शशिकांत राऊत

Classics

* माझे माहेर पंढरपूर *

* माझे माहेर पंढरपूर *

1 min
565

विठ्ठल रखुमाई भेटी लागे हुरहूर,

आवडे मज माझे माहेर पंढरपूर।।धृ।।


दीन दुबळ्यांचा असे पाठीराखा,

शिरावरी हात ठेवी बंधुत्व सखा,

भक्तगण भेटायला झाले आतुर।।१।।


संकटसमयी सांभाळी विठूराया,

भक्तांवरी असे तुझी सदैव माया,

दर्शनास वारीत वारकऱ्यांचा नूर।।२।।


ठेवूनी वारकरी मनी तुझी भक्ती, 

पायी चालता दिंडी येतसे शक्ती,

विठ्ठल नामाचा घुमे भजनात सूर।।३।।


चंद्रभागे तीरी भरे भक्तांचा मेळा,

पाप-पुण्यासाठी स्नानास गोळा,

भक्तांच्या मांदियाळीचा गंगेस पूर।।४।।


माऊली जगाची लक्ष लेकरांवरी,

पहातसे सकळां राहुनी पंढरपुरी,

विठ्ठलाचे भक्तां नसे कधी अंतर।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics