STORYMIRROR

शशिकांत राऊत

Others

4  

शशिकांत राऊत

Others

* शब्दास रुप येता *

* शब्दास रुप येता *

1 min
548

गुंफूनी शब्द माला,

काव्य साकार झाले,

"शब्दास रुप येता"

गीत आकारा आले...

     शब्दांची फुले होता,

     काव्य खुलून आले,

     "शब्दास रुप येता"

     ओठांशी सूर आले...

नको कधीच तंटा,

शब्दाने शब्द वाढे,

"शब्दास रुप येता"

प्रेमभाव तो घडे...

     जाणूनी घ्यावे इथे,

     शब्दांमधील उणे,

     "शब्दास रुप येता"

     काव्याचे होई सोने...

नको सदा जीवनी,

कुणासवे तो वाद,

"शब्दास रुप येता"

उत्तम घडेल छंद...

     काव्यामधील गोडी,

     अमृत-तुल्य गाभा,

     "शब्दास रुप येता"

     वाढे ज्ञानाची शोभा ...


Rate this content
Log in