STORYMIRROR

शशिकांत राऊत

Inspirational

3  

शशिकांत राऊत

Inspirational

* वंदन माय मराठीला *

* वंदन माय मराठीला *

1 min
181

शिवरायांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र घडविला,

माय मराठी भाषा माझी वंदन करतो तिला।।धृ।।


संतजनांनी पाया रचिला ग्रंथ संस्कृतीतुनी,

थोर महात्मे गात थोरवी अभिमानाने जुनी,

गौरव वाटे महाराष्ट्रात जन्म लाभला मला,

माय मराठी भाषा माझी वंदन करतो तिला।।१।।


गाण्यांमधुनी साजशृंगार लावणीत नटविले,

मराठीतल्या भक्तिगीतात भाव ते दाखविले,

माऊलीचा तोचि भक्तगण अभंगात रंगला,

माय मराठी भाषा माझी वंदन करतो तिला।।२।।


सांज सकाळी मधूर गीतं ऐकावी वाटती,

पोवाड्याने शौर्यपणाची प्रेरणा जागविती, 

ओवीमधुनी साज मराठी भाषेला चढविला,

माय मराठी भाषा माझी वंदन करतो तिला।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational