STORYMIRROR

शशिकांत राऊत

Classics

3  

शशिकांत राऊत

Classics

* दिव्या दिव्यांची ज्योत सांगते ! *

* दिव्या दिव्यांची ज्योत सांगते ! *

1 min
574


वृत्त :- ** (मात्रा :- ८+८+८ = २४)


देवापाशी सांज सकाळी दीप तेवतो,

मांगल्याच्या पावित्र्याने घरे उजळतो।।


औक्षण करिती निरांजनासह शुभ दिवसाला,

त्या ज्योतीने दीर्घ आयुचा आशिष मिळतो।।


दीपस्तंभ तो पणतीचाही लुकलुकणाऱ्या,

अंधःकारा दूर सारुनी तेज झळकतो।।


समईमधली दैवी किरणे चहुबाजूंना, 

पंचम ज्योती एकजुटीचा संगम दिसतो।।


ग्रंथ संस्कृती साहित्याचा मौलिक ठेवा, 

संस्कारांनी ज्ञानदीप हा जगी पसरतो।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics