STORYMIRROR

शशिकांत राऊत

Classics

3  

शशिकांत राऊत

Classics

* निसर्ग *

* निसर्ग *

1 min
379

तीन ऋतुंच्या मासाने,

फुले निसर्गाचा गाभा...

फिटे डोळ्यांचे पारणे,

त्याची पाहुनिया शोभा...


खग विहार करती,

भासे कमान नभात...

वृक्ष फुलूनी डोलती,

संगे वाऱ्याच्या झोतात...


रान भरले झाडांनी,

कल्पवृक्ष ते असती...

त्यांच्या गुणांची पारख,

संत ऋषीमुनी देती...


पशु आनंदे राहती,

वनी गुहेच्या पोटात...

अन् संचार करती,

जसे स्वातंत्र्य थाटात...


झरे वाहती डोंगरी,

उंच खडका-वरुनी...

धारा दुधावानी येती,

तृष्णा भागवी अवनी...


मोठे अफाट सागर,

जल तरंगांचा मारा...

मिळे समाधान मना,

सांजवेळी त्या किनारा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics