* आम्ही मित्र *
* आम्ही मित्र *
"हे बंध रेशमांचे" मनी ठेवूनी,
आपुलकीचे सदा नाते जपूनी,
सवंगडी सोबती आलो एकत्र, कारण आम्ही मित्र।।
कोणाला बालपणाची आठवण,
कोणाला तरुणाईची साठवण,
प्रत्येकाचे आहे एकमेव सत्र, कारण आम्ही मित्र।।
कोणीतरी काढतो मजेने खोडी,
कोणी करे कुणावर कुरघोडी,
स्वच्छ सर्वांचेच मन आहे मात्र, कारण आम्ही मित्र।।
सहाय्य करणे ध्येय एकमेकां,
देणे नाही कधीही कुणास धोका,
मदत करणे हे एकच सुत्र, कारण आम्ही मित्र।।
कोणी देत असे मजेचे चटके,
कोणी करितसे विनोदी चुटके,
हसविण्याचे हे मजेदार चित्र, कारण आम्ही मित्र।।
सुख, समृद्धी, शांती सर्वांस येवो,
दु:ख, दारिद्रय, भ्रांती सर्वांची जावो,
आनंदीत राहो सर्वांचेच गोत्र, कारण आम्ही मित्र।।
एकच आमचा अट्टाहास असे,
एकच सर्वांवर विश्वास असे,
धरु सर्वांवरती मायेचे छत्र, कारण आम्ही मित्र।।
