STORYMIRROR

शशिकांत राऊत

Classics Inspirational

3  

शशिकांत राऊत

Classics Inspirational

* दीपोत्सव मनातील *

* दीपोत्सव मनातील *

1 min
333

करुनिया रोशणाई,

घरं सारे उजळती...

दारी बांधूनी तोरणे,

सप्तरंगी सजविती...


"दीपोत्सव मनातला",

करु सुंदर साजरा...

दीन दुबळ्यांच्या मना,

भरु आनंद हसरा...


होऊ अनाथांचा नाथ,

देऊ आश्रमांत भेट...

जाऊ उजाळा देण्यास,

त्यांच्या जीवनात थेट...


दीपज्योती ओवाळूनी,

करु वंदन तयांना...

सीमेवर लढणाऱ्या,

देशप्रेमी सैनिकांना...


जपुनिया माणुसकी,

दीप घरोघरी लावू...

सांभाळूनी स्नेहभाव,

अंतर्मनी माया ठेवू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics