ओवी मोक्षपटाची
ओवी मोक्षपटाची
मला जन्म मिळाला मुक्ताई
खेळते संसार सोपान माई ।
निवृत्ती धडे दिधले ज्ञानाई
ओवी मोक्षपटाची पुण्याई।।धृ।।
वीस गुणेला वीस इंचाई
पन्नास घरे ती चौकोनाई।
पहिले घर ते माझ्या जन्माई
अखेरचे ते घर मोक्षपटाई।।१।।
सहा कवड्या मज दिल्या ती
पालथ्या पडल्या ते दान येती।
काम क्रोध माया ये मजला ती
लाभ मोह मद मत्सर ये भरती।।२।।
ही षडरिंपूची कामे साप तोंडी
मध्ये आयुष्य टप्प्यावर ये शिडी।
शिडी चढणे सत्संग द् या शांती
सद्बुद्धी दिधली नि मनशांती।।३।।
ज्ञानियाचा राजा दावी हा बोध
तेराव्या शतकांचा असे हा शोध।
चांगले संस्काराचे पेरले ते बीज
मोक्ष तत्वज्ञान शोधले महाबीज।।४।।
अजुनही खेळतो खेळ सापशिडी
कधी सापतोंडी नि कधी घेतो उडी।
या चार भावंडाचे हे युग उतराई
मोक्षपट खेळा,मिळे मुक्ती बाई।।५।।
