तो...
तो...


बालपण कसं निर्धास्त असतं त्याच्या खांद्यावर....
बिनधास्त जगता येत तारुण्याच्या हिंदोळ्यावर...
मागितलं ते मिळणारं तो जणू एक कल्पवृक्षच....
जादू केल्यागत तो कसं आणि कुठून आणतो त्याचं त्यालाच ठाव....
त्या स्वप्नपूर्तीच्या नंदनवनाचं 'बाप' असतं नाव....
मोठे आपण होत जातो तो मात्र तिथंच राहून अपेक्षा पूर्ण करत राहतो....
जाणिवेच्या जगापासून अलिप्त ठेवत आपलं बालपण तो जपत राहतो.....
बापमाणसाची भळभळती जखम भाळी लेऊन तो निरंतर कळजी वाहत राहतो....
अपेक्षांचा त्याच्या रोज भंग होत राहतो....
तरी तो मात्र एकट्यात स्वतःलाच कोसत राहतो.....
माय बिचारी आपली कुठली तरी माहेरवाशीण....
निरोप तिला तिकडचा कधी मधी येत असतो....
हा मात्र आपल्याच घरात पोरका रोज होत राहतो....
सर्वांच्या सुखाचा शोध घेता-घेता....
तो अगदीच खोलात जातो....
शेवटी अस्तित्व पुसता कोणी? तो मात्र,
स्वतःलाच हरवून बसलेला असतो.....