महाराष्ट्रातील सण उत्सव
महाराष्ट्रातील सण उत्सव
महाराष्ट्रातील दऱ्या-खोऱ्या म्हणजे मराठ्यांची शान
आम्हा इतिहासाच्या संस्कृतीची जाण
सण-उत्सवांचा आम्हा मोठा अभिमान...
शोधतो आम्ही मराठे क्षणा-क्षणांच्या कणा-कणातून सुख
नाव अनोखे देऊन त्याला देतो उत्सवाचे रूप...
दृष्टांताच्या रूपाने दिला आई भवानीने शिवबास आशीर्वाद
नवरात्रीच्या नवदिवसातून होतो अंबेचा घंटानाद...
इतिहासाची पार्श्वभूमी सांगते राम सज्ज झाला
दृष्ट रावणाच्या संहारा
नष्ट केले लंकेश्वराच्या अहंकारा
नाव शोभते त्याला दसरा...
अंध:काराला करुनी दूर प्रकाशाची वाट धरती
अभ्यंग पहिल्या स्नानानंतर नाम लाविता भाळी
सुरूवात होते येथूनी तीच खरी दिवाळी...
दुर्गुणाचा करून लोप सद्गुणा आत्मसात कराया, करती साजरी होळी
दिसते त्यातून संस्कृतीची छटा मराठमोळी...