STORYMIRROR

श्रुती मुंगीकर

Others

3  

श्रुती मुंगीकर

Others

तुझी माझी भेट...

तुझी माझी भेट...

1 min
336

तुझी माझी भेट.......

मला भासलेल एक मृगजळ,

कधी त्याने मला खुणावलं,

कधी मी त्याचा पाठलाग केला,

हाती मात्र दोघांच्या कोणीच नाही लागलं.....


तुझी माझी भेट.......

हातून निसटलेलं फुलपाखरू एक चंचल,

कधी ते माझ्या भोवती भिरभिरल,

कधी मी त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला

हाती मात्र दोघांच्या कोणीच नाही लागलं.....


 तुझी माझी भेट.......

 नदीला लागलेली सागराची आस,

 कधी लाटांनी तिला कवटाळल,

 कधी ती दुथडी भरून त्याला मिळाली, 

 कधी त्याच्या ओहोटीने तर कधी तिच्या बांधांनी त्यांना अडवल, 

 हाती मात्र दोघांच्या कोणीच नाही लागलं.....


तुझी माझी भेट.......

ओळखी - अनोळखीचा जणू खेळ लगोरी,

कधी ओळखीची उतरंड चढत गेली,

कधी अनोळखीपणाची उंची वाढली,

चेंडूने मात्र एकदा ती पुरती विस्कळीत केली,

हाती मात्र दोघांच्या कोणीच नाही लागलं...


Rate this content
Log in