भी 'ती'
भी 'ती'
भी 'ती' या शब्दातच 'ती' च आणि 'भयाच' समीकरण झालं.....
त्यानंतर सुरूच झाली 'ती' च्या भी 'ती' ची मालिका.....
जन्मताच' नकोशी ' होण्याची भी 'ती'
समाजात वावरताना ' निर्भया ' होण्याची भी 'ती'
कर्तृत्व सिद्ध करताना अस्तित्व राखण्याची भी 'ती'
बिनधास्त वावरताना चारित्र्य जपण्याची भी 'ती'
नकार देताना कधी अॅसिड तर कधी पेट्रोल हल्ल्याची भी 'ती'
पुरुषार्थ गजवताना ' स्त्रीत्व ' जपण्याची भी 'ती'
एक भूमिका बजावताना अनेक भुमिका
पेलण्याची भी 'ती'
नवनिर्मिती होताना जनन आणि मरण यातनांची भी 'ती'
असंख्य अशा भी 'ती' अन् मर्यादांच्या भिं 'ती' ही...
