बहर नक्षत्रांचा...
बहर नक्षत्रांचा...


तरुलतांना बहर श्रावणसरींनी चढतो.......
कदंबातळी सारंग सखा राधिकेचा होताना,
मात्र, बहर नक्षत्रांचा होतो....
ढग दाटून येता नभी पिसारा मयूराचा फुलतो.....
पहाटे-पहाटे निशेला चाहूल अरुणाची लागताना,
मात्र, बहर नक्षत्रांचा होतो.....
स्वप्नातला क्षण तो नेहमी नयनी दाटतो.....
चुकवत नजर कांताची नववधू सावरताना,
मात्र, बहर नक्षत्रांचा होतो.....
पौर्णिमेचा चंद्र नभी हितगुज चांदणीशी करतो....
गगनी अठ्ठाविसावे नक्षत्र उगवताना,
मात्र, बहर नक्षत्रांचा होतो...