कविता
कविता
1 min
12K
कविता म्हणजे प्रतिभेचं आंगण....
कविता म्हणजे शब्दांच चांदणं....
कविता म्हणजे रातराणीचा गंध....
कविता म्हणजे भाव- पदरांचा बंध....
कविता म्हणजे सजलेला केशसंभार....
कविता म्हणजे भावनांनी केलेला शब्दंचाच संसार......
तर कधी,
कविता होते व्यवस्थे विरुद्ध केलेलं बंड....
कविता असतो एक संघर्ष अविरथ आणि अखंड.....
कविता रोज करते 'ती' च्या वतीने प्रक्षोभ नवा....
कविता फुंकते रणशिंग तर कविता एक अलगद फुंकर घालणारा पावा....
कविता असते निरंतर घेतलेला ध्येयाचा वसा....
कविता असते प्राक्तनावर उमटवलेला यशाचा ठसा...
