श्लोक
श्लोक
1 min
391
गाई गाई पाहिले तुझे मुख
मला मिळू दे सुख
गाई पाहिले तुझे डोळे
जसे लोण्याचे गोळे
गाई गाई पाहिले तुझे शिंग
मला पडू दे बारालिंग
गाई-गाई पाहिला तुझा गळा
मला भेटू दे साधू-संतांचा मेळा
गाई गाई पाहिली तुझी पाठ
तीर्थ घडली तिनशे साठ
गाई गाई पाहिले तुझे खूर
तेच माझे पंढरपूर
गाई गाई पाहिली तुझी कास
मला तुझ्या दर्शनाची आस
गाई-गाई पाहिले तुझे शेपूट गंगा
माझा नमस्कार काशीविश्वनाथाला सांगा