प्रेमभावना
प्रेमभावना
1 min
261
प्रेमभावनेत असा आज कोणही नसतो
अन् मनात भाव तसे ना कुणीच बाळगतो
माणसात प्रेम अता आटले असे दिसते
स्नेह बंधने तुटता दुःख अंतरी करतो
भेद भाव खूप असा आपसात मी बघतो
स्पष्ट बोलणे नसणे हीच कारणे म्हणतो
ना कुठेच किंमत ती माणसास या जगती
आव मात्र खूप तसा माणसात मी बघतो
गोड बोलणे तुमचे फार चांगले असते
ऐकुनी असेच कुणी भाळतात ओळखतो.