आईच्या गोड आठवणी
आईच्या गोड आठवणी
तुमचा विश्वास असो अथवा नसो
प्रत्येकाची आई ही आईच असते
तिच्या मायेला नसते कुणाची उपमा
अनंतकाल ती मातृरुपातच वावरते
आईच्या गोड आठवणीची साठवण
हृदयाच्या तिजोरीत ठेवल्या जपून
निवांत समयी मी एक एक आठवते
आणि भूतकाळात माझ्या जाते रमून
तिच्या संस्कारांच्या अनुकरणाने माझे
संसारी सौख्य भोगते मी स्वर्गसुखाचे
आईच्या एक एक कौटुंबिक जबाबदारी
दैदिप्यमान सौख्य होते तिच्या संसाराचे
सत्यवचन, कठोर शिस्त, उदार वृत्ती
दीनास मदत व भूतदया पशू पक्ष्यांवर
आई माझी पाहिली होती मी बालपणी
अन् तेच संस्कार घडले माझ्या मनावर
समानतेची वागणूक सकल जनांना
माणुसकीच धर्म तिने पाळला जीवनी
आदरतिथ्य करत होती हसत मुखाने
'गृहलक्ष्मी' सन्मान दिला आजोबांनी
कर्तव्यदक्ष, प्रामाणिक,कनवाळू स्वभाव
समजूतदारपणा सहनशीलता असावी
बिंबवत होती आम्हा मुलींच्या मनावर
मुलींनी ही सर्व ते अंगिकारले स्वभावी