शिल्पकार
शिल्पकार


भीमराव रामजीचे
संविधान शिल्पकार
राज्य घटनेने दिला
मतदान अधिकार.
दलितांच्या उद्धारार्थ
प्राण पणाला लावुनी
समतेची दिव्य ज्योत
दिली छान पेटवुनी.
सत्याग्रह चवदार
महाडच्या तळ्यासाठी
भीम शक्ती दाखवली
काळाराम देवासाठी.
दिले स्त्रीला ते स्वातंत्र्य
मनुस्मृती पेटवुनी
सामाजिक बांधिलकी
बौध्द धर्म स्वीकारुनी.
शोषितांच्या जीवनाला
दिले संदेश प्रज्ञेचे
भीम शक्ती विद्वत्तेने
कार्य समाज क्रांतीचे.
अभिमानास्पद उंची
विद्या ज्ञान संपादुनी
अष्टपैलू व्यक्तीमत्व
दिव्य कार्य साकारुनी.