STORYMIRROR

Devashri Pujari

Tragedy

4  

Devashri Pujari

Tragedy

तुझी साथ

तुझी साथ

1 min
493

काळजातल्या आठवणींना वळण आज भेटले

ओघळले ते अश्रू जे तुझ्या आठवणींत रमले


तुझ्या प्रेमाचा ठसा माझ्या हृदयात कोरलास तू

आठवणीत तुझ्या माझे जग अपुरे केलेस तू


सांग ना काय करू मी या अनोळखी दुनियेत

तुझ्याशिवाय कशी जगू मी या एकाकी अवस्थेत


माझ्या जगण्याचा वाटाच तू हिरावून घेतलास

तू गेलास अन् माझा जीवही घेऊन गेलास


अशा अपूर्ण जीवनाचे तरी मी काय करू

जिथे तू नाहीस अशा दुनियेचा त्याग करु?


सोड ना हा अबोला जवळ ये ना माझ्या

देवाला सांगून एकदातरी भेटीला ये ना माझ्या  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy