STORYMIRROR

Devashri Pujari

Others

3  

Devashri Pujari

Others

तुझं माझं प्रेम...

तुझं माझं प्रेम...

1 min
687

माझ्यात तू आणि फक्त तूच आहे,

आपण भेटलेल्या क्षणांचा संग्रह माझ्या हृदयात आहे।


प्रेम ओसंडून न्हाले जेव्हा आपली भेट झाली,

रातराणी ही उमलली दिवसाच्या प्रहारी,

तिचीही साथ मिळाली, जेव्हा आपली नजरानजर झाली।


झरेही वाहू लागले कड़क उन्हाच्या प्रहरी

जणू निसर्गानेच होकार दिला ह्या बदलत्या प्रहरी।


ऊनही होते, पाऊसही होता जणू एका ऋतुत दोन ऋतुंच्या प्रेमाचे मिलाप होत होते,

तूही होतास अन् मी होते, बघताक्षणी तुझ्यात गुंतून मी स्वतःला हरवून बसले होते।


हॄदयाच्या स्पंदनाला जणू तुझ्या स्पर्शाचीच जाणीव होत होती,

म्हणूनच की काय कोकिळाही आपल्या प्रेमाचे गीत गात होती।


माझ्या दूर जाण्याच्या विचाराने जेव्हा तुझे डोळे पाणावले होते

तेव्हा डोळ्यात मी तुझ्या माझ्याबद्दलचे प्रेम बघितले होते।


माझ्या श्वासात श्वास असताना तुझी साथ मला हवी आहे,

तू नसशील तर ही दुनिया नक्कीच माझ्यासाठी निर्रथक आहे।


Rate this content
Log in