STORYMIRROR

Devashri Pujari

Others

2  

Devashri Pujari

Others

तो...।

तो...।

1 min
480

भावनांचा कल्लोळ तो मनी दाटतो,

बोलतांना मात्र तो अभावनिक वाटतो।


शब्द संपतात त्याचे मात्र अश्रु संपत नाही,

कारण भावनेच्या झऱ्याला कोणीही थांबवु शकत नाही।


अभावनिकतेच्या त्याचा अभिनयाने तो जगाला भुरळ घालतो,

मग साथ मिळता प्रेमाची तेव्हा तो भावनिक होऊन जातो।


हृदयाच्या स्पंदनांना जगासमोर जगण्याचा भाग मानतो,

एकांतात मात्र तो याच स्पंदनांशी भावनेचे नाते जोडतो।


त्याच्या या अभावनिकतेला तो जगण्याची कला मानतो,

मग कधी कधी भावनिक होऊन स्वतःलाच विसरून जातो।


साहित्याला गुण द्या
लॉग इन