हाक पित्याची
हाक पित्याची
शरीर ही थकले, जीवही थकला आता हाक कोणाला मारू।
होते जे माझें त्यांनीच केले परके,आता साथ कोणाची मागु।
रक्त सांडले ज्यांच्यासाठी, आज त्यांनीच वेदनेत सोडले।
जीव खर्ची केला ज्यांच्यासाठी, आज त्यांनीच मरण्यासाठी सोडले।
हौस पुरवण्यासाठी त्यांची, मी माझी हौस मारली।
आज औषधासाठी पैसे मागता, त्यांनी माझी लायकी काढली।
कष्ट सोसले, घाम गाळला, रात्रीचा दिवस ही केला।
पण लेकरांची भूक मिटवता मिटवता, आज हा बापच परका झाला।
इवले इवले कोवळे तुझें हाथ धरून मी तुला जगाची महती सांगितली।
मात्र आज या थरथरत्या हाताची काठीच तु हिरावुन घेतली।
मी ही होतो लेक कोणाचा, पण अशी स्तिथी मांडली नाही।
असभ्य वर्तवणूक देऊन मी, माझ्या वडिलांची मान कधी झुकवली नाही।
लेक आहेस तु माझा आज, उद्या तु ही बाप होशील ना।
भूतकाळातील पाने जर उलटली तुझ्या वर्तमानात तर या बापाची व्यथा समझशील ना ?
अंश आहेस तु माझा, माझ्या हृदयाची स्पंदने ही तूच आहेस ।
सुखी रहा लेकरा माझ्या, हा बाप नेहमी तुझ्या सोबत आहे।
