वाळवंटासम शुष्क हृदयावर पडणारे पाऊसथेंब
वाळवंटासम शुष्क हृदयावर पडणारे पाऊसथेंब
वाळवंटासम शुष्क हृदयावर पडणारे पाऊसथेंब
तुझ्या श्वासाच्या गतीबरोबर धडधडणारे हृदय माझे,
तुझ्या मिठीत असतांना ओघळणारे अश्रू माझे,
तुझ्या विचारांत गुंतणारे शब्द माझे,
तुझ्या समवेत असतांना तुलाच बघणारे नयन माझे,
तुझ्या डोळ्यात मला बघणे हे स्वप्न माझे,
तुझ्यात मी माझ्यात तु असण्याचे विचार माझे,
तुझ्या विचारात माझे विचार असणे हे सौभाग्य माझे,
तुझ्या जीवनात तु मला स्थान द्यावे हेच तर जीवन माझे,
तुलाच तर शोधते मी माझ्या आठवणीत,
तुलाच तर बघते मी माझ्या सवयीत,
तुलाच तर माघते मी माझ्या प्रार्थनेत,
तुझ्याविना जीवन माझे व्यर्थ आहे,
तुझ्याविना माझ्या जीवनाचा अर्थ नाही आहे,
तुझ्याविना मी आत्म्याविना शरीर आहे,
तुझ्याविना जीवन माझे पाण्याविना वाळवंट आहे,
तु असतांना जीवनाचा अर्थ आहे,
तुझ्यात मी हाच माझा धर्म आहे,
तु म्हणजे माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ आहे,
तुझ्यात माझ्या जीवनाचा अर्थ आहे,
तु म्हणजे शुष्क हृदयावर पडणारे पाऊस थेंब जसे...

