या मराठवाड्यात माझ्या
या मराठवाड्यात माझ्या
या मराठवाड्यात माझ्या,
नदी कोरडी खडक उघडा,
पिण्यास पाणी नाही,
वारा वाहतो ढग वाहतो,
पाऊस कुठेच नाही,
या मराठवाड्यात माझ्या.
उद्योग नाही, काम नाही,
जनावरे उपाशीच सारी,
बंद का केली छावणी ?
या मराठवाड्यात माझ्या.
गवत वाळले, पिके वाळली,
नळाला नाही पाणी,
गाव, गाव कोरडा सारा,
रोजगार नाही, हाती नाही पैसा,
या मराठवाड्यात माझ्या.
भेगळलेली जमीन तशीच,
शुष्क पाने, शुष्क झाडे,
पक्षी घरटे सोडून गेले,
या मराठवाड्यात माझ्या.
मेंढीला गवत नाही,
शेळीला गारवेल नाही,
गायी हिंडती रानवने,
वासराला दूध नाही,
या मराठवाड्यात माझ्या.
दुष्काळाने त्रस्त जनता,
काही उद्योग डोक्यात नाही,
काय करावे, काय नाही,
वैफल्यग्रस्त आम्ही,
या मराठवाड्यात माझ्या.
