STORYMIRROR

Sunita Ghule

Tragedy

4  

Sunita Ghule

Tragedy

वीरपत्नीची व्यथा

वीरपत्नीची व्यथा

1 min
120

वीरपत्नीची व्यथा


भावनांच्या कल्लोळाने

मनी माजले काहूर।

असा सोडून एकटा

सख्या का रे गेला दूर?


तिरंग्यात लपेटल्या

तुझ्या निष्प्राण देहाला

अभिषेक आसवांचा

कित्येकदा मी वाहिला।


देशासाठी बलिदान

तुज मान शहिदाचा

सुने आभाळ रे माझे

धनी गेला कुंकवाचा।


चिमुकल्या पिलांसाठी

हरवला त्यांचा पिता

आठवांचा मूकुटच

आधारच झाला रिता।


चार दिस हौतात्म्याचे

हूरहूर करी जग

वाळवंट आयुष्याचे

कसा सोसायचा भोग।


मातृभूमी प्राणप्रिय

जागलास वचनास

सप्तपदी सोबतीच्या

पथी काटे अर्धांगीस।



સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Tragedy