जनसेवा ( अभंग रचना )
जनसेवा ( अभंग रचना )
आजचे पुढारी I थोतांड करती |
आनिक म्हणती I जनसेवा ॥ १ ॥
फुकाचे भाषण | कृती नाही काही I
दिशा केल्या दाही I भ्रष्टाचारी ॥ २ ॥
होत्या त्या वेगळया | व्यक्ती हो महान I
जीवाचे ते रान | देशासाठी ॥ ३ ॥
झिजवली काया | अखेरचा श्वास |
दिला समाजास I मनोभावे ॥ ४ ॥
ते महापुरुष | वंदनीय पहा |
विचारात रहा | सदा त्यांच्या ॥ ५ ॥
दुसऱ्या डोळयात | आनंद पाहता |
सुखाने वाटता | मुक्तपणे ॥ ६ ॥
खरच आनंद I मिळतो असाच I
वसा घेतलाच | जनसेवा ॥ ७ ॥
