Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Tragedy

3  

Mrudula Raje

Tragedy

वाट पाहतो अंताची

वाट पाहतो अंताची

1 min
224


बालपणीचे सुख अनुभवले, तू बाबांचा धरून हातात हात |

त्यांच्याच पाठिंब्याने तू केलीस प्रत्येक संकटावर मात ||


कधी भरवला घास त्यांनी, आपल्या काढून ताटातून |

कधी हौस पुरवली तुझी, पैसे खर्चून कर्जातून ||


कळलेच नाही कधी तुला, तू बोट सोडले बाबांचे |

कॉलेज मध्ये वावरताना, थवे जमवले मित्रांचे ||


कधी मिळाली मोठी नोकरी, केली परदेशी वारी |

परदेशी पाठवण्यासाठी, बाबा करती रिती तिजोरी ||


वाट पाहती आई-बाबा, परतून येईल पुत्र कधी |

आठवणी काढता आईच्या नेत्री, धार अश्रूंची अधी-मधी ||


आई वारली, फोन बाबांचा आला जेव्हा सांगाया |

परदेशस्थ पत्नी सवे तू निघाला होता पर्यटना जाया ||


"उरकून घ्या क्रियाकर्मे, येईन नंतर कधी मी भेटायला" |

शेवटचे हे शब्द पित्याच्या, टोचत राहती हृदयाला ||


वर्षे लोटली चार-पाच, अन पिता काढतो आठवणी |

बालपणीचा फोटो तुझा, तेवढीच स्मृतींची साठवणी ||


पण येऊन अचानक एके दिवशी बोलतोस तू बाबाला |

"बंगला मोठा इतका ठेवून, करणार तुम्ही काय भला? ||


विकून टाका पैसे मिळतील, गिऱ्हाईक मी घेऊन आलो |

राहण्यासाठी तुमची सोय, मी वृद्धाश्रमी करून आलो" ||


'जगावे की मरावे' हा यक्षप्रश्न पडला ज्याला | 

मरणासम जीवन देऊन काळकोठडी दिली तू त्याला ||


बंगल्यामध्ये राहण्याची हाव नव्हती रे कधीच त्याला |

तुझ्या एका हाकेसाठी जन्मभरी तो आसुसला ||


बोट धरुनी ज्या बापाचे बालपणी तू शाळा शिकला |

त्या बापाच्या अंतिम समयी तू वृद्धाश्रम त्या दाखवला ||


विसरू नको तू चक्र गतीचे, उद्या तूही होशील पिता |

पुत्र तुझा मग दावील तुजही, वृद्धाश्रमाचा रस्ता रिता ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy