STORYMIRROR

Mrudula Raje

Tragedy

4  

Mrudula Raje

Tragedy

दुभंगलेले मन

दुभंगलेले मन

1 min
365


माणूस दुभंगलाय! होय, फुरसतच नाही त्याला आपल्या अंतरात डोकावण्यासाठी।

मनाच्या तळकोप-यात साठलेल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी॥


चंचल मन धावतंय मागे; बालपणीचे शौक पूर्ण करायला।

तारुण्यात शिकलेले नवे कला- क्रीडा प्रकार परत अनुभवायला॥


पण आयुष्याच्या ह्या वळणावर, कुठे आहे मुभा बालपणाकडे परत वळण्याची?।

राहून गेलेले छंद, आवडी, पूर्ण करण्याची? आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची?॥


आता तर धावायचे आहे फक्त कीर्ती आणि पैशांच्या मागे।

नवे व्यवसाय, नव्या नोक-या, नव्या जबाबदा-या, पेलताना कसे गुंफणार जुन्या स्वप्नांचे धागे?॥


थोरांचा मिळ्तो सल्ला, "मन गुंतलेले मागे आवरा, समजून घ्या जगाचा इशारा।

बढतीच्या कामात नकोच वेळेचा अपव्यय आणि जुन्या छंदांचा पसारा॥


करायची आहे खूप प्रगती; धावायचंय गाठायला कर्तृत्वाचे शिखर।

मग अशात कसा साधणार मेळ? सोडून दे छंद; आता जुने जीवन विसर!! "


नाही, नाही; तरीही मनाला लागतेच ओढ; एक तरी 'किक ' मारावी फुटबॉलला!।

कधी हातात घेऊन बॅट, द्यावा मस्त- बेफाम शाॅट; नाहीतर धुंदीत धरावा ताल आणि मस्त वाजवावे तबल्याला॥


हात शिवशिवतात, पाय थिरकतात; मग मन आपले राहतच नाही!।

कामाच्या जागी सुध्दा , मन दिवास्वप्न पाहतच राही॥


ह्यावर एकच साधा उपाय! सुट्टीचा 

आनंद लुटत, साधायची आपली पूर्ण हौस ।

सोडून आपल्या प्रतिष्ठेचा माज; शिरून बाळपणात, पुरवून घ्यायचा मनाचा सोस॥


होय! नाहीतर असेच राहाल ; नेहमीच दुभंगलेले, मनाने खचलेले, उसवलेले !।

घ्यायचा असेल जर जीवनाचा आनंद, तर राहा मस्तीत उधाणलेले!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy