STORYMIRROR

Gayatri Shirsat

Tragedy

4  

Gayatri Shirsat

Tragedy

हल्ली ती काय करते?

हल्ली ती काय करते?

1 min
346

ती गर्भात असताना तपासली जाते

एखादी स्त्री अनेक यातनांतून जन्म घेते

ती हसते बागडते आईच्या कुशीत

पण तिचे ते हसणे बागडणे आईच्या कुशीतच संपते


वयाबरोबर बनत जाते ती अस्मिता

खानदान की इज्जत वगैरे

जिवंतपणी बनते गुलाम

पुरुष नावाच्या प्राण्याची

तो कधी बाप असतो, कधी भाऊ असतो,

कधी प्रियकर असतो, तर कधी नवरा असतो


हे सर्व तिला वापरतात आपले

पुरुषी नाते अबाधित ठेवण्यासाठी

आणि हेच पुरुषी महाभाग

पुन्हा दुसऱ्या घरातील ती हल्ली काय करते

विचारत राहतात


हो पण ती थांबली नाहीये,

ती लढलीय आणि लढतेदेखील

विनाकारण होणाऱ्या स्पर्शाचे सोबत

ती लढते छाताडावर टपलेल्या

वासनांध नजरेसोबत

ती लढते खानदान की इज्जतं

नावाखाली लावून दिलेल्या

लग्न नावाच्या परंपरेसोबत


हल्ली ती काय करते

ती सुनिता विल्यम्स झालीये

कल्पना चावला झालीये

ती सायना, सिंधू, साक्षी झालीये

तरीही आपण तिच्यात शनीच शोधतो

विचारतो हल्ली ती काय करते


हल्ली ती फक्त फक्त गर्भातच नाही मारली जात

तर ती रोज मारली जाते परंपरेने

तिच्यावर कुठला एक नराधम नाही करत बलात्कार

तर त्या नराधमाने केलेल्या बलात्काराची

पायरी करून उभारतात तिच्यावर

हजारो राजकीय इमले


तर ती पल्लेदार अस्मिता वाचक भाषणांचा विषय

बनलीये,पेटलेल्या चितेवर पोळ्या भाजण्यासाठी

ती एक साधन बनलीये, हो तीच

आई, बहिण, मैत्रीण, प्रेयसी आणि बायको

रोज रात्री समाजमान्य बलात्कार स्वीकारून

जन्म देते जाती, धर्म, फालतू अस्मिता

देव, दंगे यात गुरफटलेल्या क्रियाशून्य

भावनिक समाजाला


हल्ली ती विनाकारण हसण्याचा प्रयत्न करते

बापाच्या इज्जतीसाठी नवऱ्याच्या छळाला सहन करते

कारण तिचं अस्तित्व दोन घराच्या बाहेरही आहे.

याचा तिला कोणी विश्वास देत नाहीये

तिने काहीही केलं तरी तिला विचारले जाते

हल्ली ती काय करते

पण प्रश्न विचारा स्वतःला

आपण काय करतो......?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy