STORYMIRROR

गीता केदारे

Tragedy

4  

गीता केदारे

Tragedy

शिक्षणाचे बाजारीकरण...

शिक्षणाचे बाजारीकरण...

1 min
929


वाघिणीच्या दूधाची

वाढली आहे किंमत

शिक्षणाच्या बाजारात

दलालांची झाली आहे हिंमत...


शिक्षणासाठी आताच्या काळात 

लागतोय पैसा अमाप

मुलाच्या वजनाच्या दुप्पट 

खर्च करून डोक्याला ताप... 


भरमसाठ फी अन् डोनेशन 

भरून मोडले कंबर पालकांचे 

सहन होईना भार शिक्षणाचा 

चढाओढ काढण्या प्रथम नंबर मार्कांचे ... 


शिक्षणसंस्था आजकालच्या

झाल्या आहेत लुटारू

शिक्षणाच्या बाजारीकरणाला

आपणच आता सुधारू...


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy