STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

4  

Pandit Warade

Tragedy

धुमाकूळ

धुमाकूळ

1 min
293

घन घनघोर बरसला एवढा घन घनघोर बरसला

क्षणी होत्याचे नव्हते झाले इतका तो कोसळला।।धृ।।


घरात झाले पाणीच पाणी फजिती किती केली

गाडी, बंगला, भांडी, कुंडीही सारी वाहून गेली

संसाराचा खेळ खंडोबा स्वतःच्या समक्ष पाहिला।।१।।


गोठ्यामधली गाई गुरेही सोडता आली नाही

डोळ्यादेखत बुडून मेली करता न आले काही

अश्रू दाटून आले नयनी व्याकुळ जीव झाला।।२।।


क्रोधाची परिसीमा गाठली तयाने रौद्र रूप घेउनी

आप्त स्वकीय बुडतांना पाहिले हतबल होऊनी

मृत्यू भयाने जीव वाचवत आश्रय शोधीयला।।३।।


महापुराने थैमान घातले डोळ्यात दाटली भीती

मृत्यूच्या या जबड्यामधुनी जीवा जपावे किती

काळ बनून हा पाऊस आला धुमाकूळ घातला।।४।।


पाहून सारे दृश्य करुण हे कुणाचे हृदय कळवळले 

जीव स्वतःचा धोक्यात घालून मदतीला धावले

भेदाभेदाच्या तोडून भिंती मानव एक जाहला।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy