पारिजातकाच्या गंधाने
पारिजातकाच्या गंधाने
पारिजातकाच्या गंधाने बेधुंध होऊन झालंय
तिच्या हातच्या फुलांच्या सुगंधांना स्मरुन झालंय
माझ्या मनात तिचं असणं आता सवयीचं झालंय
तिला मनातून हुसकवायला त्यांचं वारंवार येऊन झालंय
व्यसनाधीन होणं म्हणजे काय हे अनुभवून झालंय
पिंगट गहिर्या तिच्या डोळ्यांच्या नशेत बुडून झालंय
माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी हे सर्वांना बजावून झालंय
तरीही त्यांचं तुझ्यावरती हक्काचं अतिक्रमण करुन झालंय
हातामध्ये हात घेऊन चालत जाणं अनुभवून झालंय
त्याच हातांवर तिचं शिक्षेचे लाल काळे चट्टे वागवून झालंय
हळव्या तिच्या डोळ्यात पाणी पाहून झालंय
कवेत घेण्यासाठी तिला बाहुंचं आसुसुन झालंय
तिच्या विरहाचं गीत गाऊन झालंय
तिच्या आठवणीत खुपसं रडून झालंय
असलं काही लिहू नको हे मनाला बजावून झालंय...
पण विरहाचं दुःख तुला काय कळणार? हे त्याचं मला ऐकवून झालंय...
