STORYMIRROR

Abhijeet Inamdar

Inspirational

4  

Abhijeet Inamdar

Inspirational

व्यथा एका सुर्याची

व्यथा एका सुर्याची

1 min
551


रम्य अशा त्या संध्याकाळी

सूर्य जेव्हा अस्तास निघाला होता

आपल्या सगळ्या किरणांचा पसारा

त्यांनी आवरून घेतला होता


तरी देखील काही खट्याळ किरणांचा

लपाछपीचा खेळ चालूच होता

त्यांच्या वरतीच चिडून मग

सूर्य तांबूस लाल झाला होता


खरं तर त्याचा रीलीवर

चंद्रही अजून आला नव्हता

अन त्याच्याच वरचा सगळा राग

सूर्यानी कोवळ्या किरणांवर काढला होता


व्यथित होऊन सूर्य मग मला म्हणाला:

आम्हासही वाटते कधी - टाकावी हाफ डे

अन जावं घरी निघून

घरामध्ये करावा आराम तिच्या हातची

कांदाभजी अन आल्याचा चहा घेऊन


पण आमच्या सारख्या इमर्जन्सी सर्व्हिस

पुरवणाऱ्यांनी नसतात द्यायची कुठली कारणं

कारण रीलीवर आल्याखेरीच आमच्या

डोळ्यांची फिटत नाहीत पारणं


वरिष्ठांच्या हुकुमापुढे

आमचं काही चालत नाही

जणू काही आमच्या शिवाय इथे

कोणाचं पानच हलत नाही


पण भाग्यवन्तांच्याच नशिबी

असतं म्हणतात असं सुख

बाकी आम्ही पडलो बिचारे इथे

सर्वांसाठी नारायणमुख


रीलीवरची त्या वाट पाहून

कातरवेळ पुरती टळून गेली

तरी देखील न येऊन

त्यानी पुरतीच कमाल केली


सहज म्हणून मग सूर्यानी

मस्टर जरा चाळून पाहिले

आजच्या दिवशी चंद्राची

लिव्ह असल्याचे मग कळले


अमावस्येच्या त्या प्रत्येक रात्री

चंद्र कधीच कामावर येत नाही

त्याच्या मागचे कारण मात्र अजून

बिचाऱ्या सूर्याला कळले नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational