STORYMIRROR

Abhijeet Inamdar

Inspirational

3  

Abhijeet Inamdar

Inspirational

अभिमानाचा एक सलाम

अभिमानाचा एक सलाम

2 mins
26.5K



सतत देशसेवेचा विचार करणाऱ्या त्यांना

स्वतःसाठी असा वेळ होताच कुठला…

कुठे बर्फाच्छादित शिखरांवर

तर कुठे प्रत्यक्ष सीमेवरच्या ज्वलंत आगीवर


कुठे रखरखीत वाळवंटात

तर कुठे समुद्रात लाटांशी झुंजत

सतत... सतत देशसेवेसाठी जगलेल्या

त्या जवानांना झोप होतीच कुठे…?


आम्ही नाताळच्या सुट्ट्या मजेत एन्जोय करतोय

नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या झोडतोय

लॉंग वीकेंडच्या सुट्ट्यांचे नियोजन करतोय

कुठे समुद्र किनारा तर कुठे हिल स्टेशन ठरतंय


त्यांचा मात्र नाताळही तिथेच अन नव वर्षही

कधी कुठे काही अनामिक नाही घडलं

अन स्वस्थतेचे काही तास मिळाले

तर तोच विकेंड अन तेच हिल स्टेशन


रात्र रात्र पार्ट्या झोडून सकाळी उशीरपर्यंत लोळणारे आम्ही सुरवंट

आगदी सराईत पणे विसरून जातो

रात्र रात्र जागून डोळ्यात तेल ओतून सीमेवर

पहारा देणारे ते जवान तिथे आहेत म्हणूनच

आम्ही भरल्या पोटी घराच्या दिवाणखाण्यात

एका हातात बडीशेप अन दुसर्या हातात टी.व्ही. चा रिमोट घेऊन बसू शकतो


यंदा थंडी खूपच पडलीय नाई?

गरम कपडे घेतले पाहिजेत… म्हणताना

आम्ही हमखास विसरून जातो

त्या तिथे उंच हिमाच्या शिखरावर

कोणीतरी जवान उणे तापमानात बसलाय…

आमच्या सारख्यांच्या कृश देहाचं वाळवण राखण करीत...

अस्ताव्यस्त देशभर पसरलेलं


रखरखीत उन्हाळ्यात… लेट्स गो टू कुल प्लेस

असे ठरवताना आम्ही सहज विसरून जातो

त्या तिथे वाळवंटात कोणीतरी जवान

स्वतःच्या जीवाची काहिली करत अन स्वतःचाच घाम पीत

बसलाय पन्नासाच्या तापमानात...

आम्हाला गारव्याला जाता यावे म्हणून


थर्टी फर्स्टला तर काय आम्ही मद्याच्या

महापुरात डुंबून जातो अन साफ विसरून जातो…

त्या तिथे दूरवरच्या पोस्ट वर अन्न पाण्याविना

एक जवान बसलाय शत्रूशी लढा देत

फक्त आणि फक्त लाल रंगाची रंगपंचमी खेळत...

आम्हाला मनमुराद जगता यावे म्हणून


अव्याहतपणे मशीन गन्स अन बॉम्ब्सशी खेळणाऱ्यांचा

आवाज आमच्यापर्यंत पोहोचेलच कसा….?

कारण आम्ही तर नुसतेच रातकिडे

मानापमानाच्या रागात अव्याहतपणे किरकिरणारे…


आनंदात त्यांना का स्मरावे...?

आम्ही त्यांना स्मरातोच की

निसर्गाच्या कोपात... प्रलयकारी महापूरात... महाभयंकर भूकंपात

पण आम्ही साफ विसरून जातो…

निसर्ग कितीही कोपला तरी त्या दुर्धर परिस्थितीत

कसलीही तमा न बाळगता

एक एक जवान उभा राहतो मानवी पूल बनून...

आम्हाला जीवनदान मिळावे म्हणून


काही नाहीतर आम्ही आहोतच… जाती पातीच्या कुबड्यांवर

अहिंसेची विटंबना करून एकमेकांना संपवू पाहणारे….

अन देशाच्या शत्रूंशी लढता लढता त्या जवानांना

अंतर्गत शत्रूंशीही लढायला भाग पडणारे…


झोपू द्या... झोपू द्या... त्यांना... नका उठवू आता…

आमच्या सारख्या भेकड जनतेची सेवा करण्यासाठी

कधी खडतर हवामानात तर कधी खडतर ट्रेनिंग मध्ये

जागलेत ते कित्येक काळ... रात्रीचा दिवस करून


आता मिळालीय त्यांना चीरनिद्रा...

आता नका करू आक्रोश त्यांच्या नावाचा

अन नका देऊ पोकळ घोषणा अन नका करु खोटे जय जयकार...

कारण आता ते पोहोचणार नाहीतच त्यांच्यापर्यंत


करायचेच असेल काही तर एकच करा….

त्या जवानाच्या उध्वस्थ कुटुंबाला आधार द्या

काहीच क्षण त्याने गोंजारलेल्या त्याच्या पिल्लांना माया द्या


आपल्यासाठी जीव जाळणाऱ्या जवानांना अभिमानाचा एक सलाम द्या...

आपल्यासाठी जीव जाळणाऱ्या जवानांना अभिमानाचा एक सलाम द्या



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational